

'चिऊकाऊ'च्या पुस्तकमालिकेतील ‘सूर्योबा’ हे दुसरे पुस्तक! ‘सूर्योबा’ ह्या पुस्तकातून चिऊकाऊच्या काही निवडक गाण्यांचा संग्रह सादर करण्यात आलेला आहे. ह्या मध्ये ‘सूर्योबा’ या बालगीतासह एकूण १० गाण्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या सर्व बालगीतांचे व्हिडिओ स्वरूपातील सादरीकरण, खाली दिलेल्या लिंक्सवर क्लिक करून पाहू शकता.
'चिऊकाऊ'च्या पुस्तकमालिकेतील ‘सूर्योबा’ हे दुसरे पुस्तक! ‘सूर्योबा’ ह्या पुस्तकातून चिऊकाऊच्या काही निवडक गाण्यांचा संग्रह सादर करण्यात आलेला आहे. ह्या मध्ये ‘सूर्योबा’ या बालगीतासह एकूण १० गाण्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
या सर्व बालगीतांचे व्हिडिओ स्वरूपातील सादरीकरण, खाली दिलेल्या लिंक्सवर क्लिक करून पाहू शकता.

१
सूर्योबा
१ सूर्योबा
एका रविवारी सुर्योबाने ठरवलं की आज 'मी फक्त म्हणजे फक्त खेळणार!' हा गोडुला सुर्योबा दिवसभर काय धम्माल-मस्ती करतो, हे पाहूया ह्या छानश्या बालगीतातून!

२
एक सोनूला आंबा
२ एक सोनूला आंबा
एकाच जागी बसून सोनूला आंबा फार कंटाळाला होता. त्याला जायचं होतं कुठेतरी भुर्र! त्याचं हे गोड स्वप्न पूर्ण होतं का हे पाहूया ह्या गोड गोड गाण्यातून!

३
बनवू कागदाच्या होड्या
३ बनवू कागदाच्या होड्या
धो धो पडणाऱ्या पावसामुळे गोंडुल्या आणि त्याचं मित्रमंडळ अगदी कंटाळून गेलं. मग त्यांना काय बरं केलं, पाहूया ह्या छानश्या गाण्यातून!

४
ताप झाला छू
४ ताप झाला छू
कुठून, कधी हा खोडकर ताप आला, हे आपल्या सयूला कळलंच नाही. आता ह्या तापाला कसं बरं छू करायचं? पुढे काय झाले ते पाहूया ह्या मजेशीर गाण्यातून!

५
बाप्पा, कुठेच नको जाऊ
५ बाप्पा, कुठेच नको जाऊ
छोट्या सयूचं गणपती बाप्पांकडे प्रेमळ, निरागस मागणं आहे. आणि त्यासाठी ती बाप्पाला कशी लाडीगोडी लावतेय, ते पाहूया ह्या गोड बालगीतातून!

६
म्याव म्याव मनी माऊ
६ म्याव म्याव मनी माऊ
म्याव-म्याव मनीमाऊ काय-काय करते पाहूया ह्या गोड-गोड बड-बडगीतातून!

७
भाज्या घ्या हो भाज्या घ्या
७ भाज्या घ्या हो भाज्या घ्या
हिवाळा आला की बाजार भरून जातो तो हिरव्यागार, ताज्या भाज्यांनी. आपला छोटा मित्र आईबाबांसोबत गेलाय मंडईमध्ये भाज्या आणायला! त्याला मंडई कोणकोणत्या भाज्या दिसतात ते पाहूया ह्या गोड गाण्यातून.

८
चिऊचं घरटं
८ चिऊचं घरटं
जंगलात सगळीकडे एवढं धुकं पसरलंय की बिचाऱ्या चिऊताईला तिचं घरटंचं दिसेनासं झालंय. पुढे काय होतं, हे पाहूया हया बालगीतातून!

९
मराठी महिन्यांचे गाणे
९ मराठी महिन्यांचे गाणे
होळीच्या सणानंतर वेध लागतात मराठी नवीन वर्षाचे. तह्या गाण्यातून मुलांना आपल्या मराठी सणवारांची सुद्धा हसत खेळत ओळख होईल.

१०
किडू आणि भिडू
१० किडू आणि भिडू
हे आगळे-वागळे पाहुणे काहीतरी सांगतायेत आजच्या ह्या गाण्यातून! चला पाहूया.