

'चिऊकाऊ'च्या पुस्तकमालिकेतील 'हत्तोबा' हे पहिले पुस्तक! हत्तोबा ह्या पुस्तकातून चिऊकाऊच्या काही निवडक बालगीतांचा संग्रह सादर करण्यात आलेला आहे. ह्या संग्रहामध्ये 'हत्तोबा' या बालगीतासह एकूण १० गाण्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
या सर्व बालगीतांचे व्हिडिओ स्वरूपातील सादरीकरण, खाली दिलेल्या लिंक्सवर क्लिक करून पाहू शकता.

१
असा माझा बाबा
१ असा माझा बाबा
हे बालगीत आहे एका छोट्या दोस्ताचं आणि त्याच्या बाबाचं! साध्या सोप्या शब्दांतून त्याचा बाबा कसा आहे, हे तो सांगतोय, चला पाहूया!

२
चांदोबा आणि ससोबा
२ चांदोबा आणि ससोबा
आकाशातल्या चांदोबाचा सगळ्यात लाडका मित्र आहे 'ससोबा'. दोघे रोज खूप खेळतात, चित्र काढतात, भांडतात सुध्दा. दोघे मित्र एकत्र काय गमतीजमती करतात, ते पाहूया ह्या गोड गाण्यातून.

३
आली पावसाची वेळ
३ आली पावसाची वेळ
भल्या मोठ्या समुद्रातल्या एका छोट्याशा थेंबाच्या प्रवासाचं हे गाणं! बालदोस्तांना साध्या, सोप्या शब्दांतून चित्रांद्वारे जलचक्राची ओळख करून द्यायचा हा छोटासा प्रयत्न!

४
राहतात कोठे
४ राहतात कोठे
हे बालगीत आहे एका छोट्या दोस्ताचं आणि त्याच्या बाबाचं! साध्या सोप्या शब्दांतून त्याचा बाबा कसा आहे, हे तो सांगतोय, चला पाहूया!

५
सरू सुरवंट
५ सरू सुरवंट
आज आपल्याला भेटायला आलंय छोटुसं सुरवंट! त्याचं नाव आहे ‘सरू’. तर ह्या छोटूश्या सरू सुरवंटाचं नकळत फुलपाखरू कसं झालं ते पाहूया ह्या गोड गंमतीदार गाण्यातून.

६
एक होतं बी
६ एक होतं बी
एक छोटंसं बी एकटंच कुठेतरी भरकटून गेलंय! ह्या इटुकल्या पिटुकल्या बी चे पुढे काय होतं, ते पाहूया ह्या गोड गंमतीदार गाण्यातून.

७
पाऊस आवडतो का त्यांना?
७ पाऊस आवडतो का त्यांना?
मुसळधार पावसात सयूची मनीमाऊ कुठेतरी हरवली आहे. त्या माऊचा शोध घेताना आईला आणि तिला कोण कोण भेटलं आणि त्यांना पाऊस आवडत असेल का? चला बरं पाहूया ह्या गाण्यातून!

८
कधी वाटतं
८ कधी वाटतं
छोट्याश्या सयूला कधी राजकन्या व्हावंसं वाटतं तर कधी परी! तिची ही इवलीशी स्वप्नं पूर्ण होतात का ते पाहूया ह्या गोड बालगीतातून!

९
पतंगाचे गाणे
९ पतंगाचे गाणे
मकरसंक्रांतीचा सण जवळ आला की वेध लागतात ते पतंग उडवण्याचे! आपला असाच एक रंगीबेरंगी पतंग चाललाय आकाशात वर वर वर…जाताना कोण कोण भेटतं ते पाहूया ह्या मजेशीर गाण्यातून.

१०
हत्तोबा
१० हत्तोबा
गोडुल्या हत्तोबाचं हे गोडुलं बडबडगीत खास छोट्या दोस्तांसाठी!!