माकडोबा
'चिऊकाऊ'च्या पुस्तकमालिकेतील 'माकडोबा' हे तिसरे पुस्तक! 'माकडोबा' ह्या पुस्तकातून चिऊकाऊच्या काही निवडक बालगीतांचा संग्रह सादर करण्यात आलेला आहे. ह्या संग्रहामध्ये 'हावरट माकडोबा' या बालगीतासह एकूण १० गाण्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या सर्व बालगीतांचे व्हिडिओ स्वरूपातील सादरीकरण, खाली दिलेल्या लिंक्सवर क्लिक करून पाहू शकता.
'चिऊकाऊ'च्या पुस्तकमालिकेतील 'माकडोबा' हे तिसरे पुस्तक! 'माकडोबा' ह्या पुस्तकातून चिऊकाऊच्या काही निवडक बालगीतांचा संग्रह सादर करण्यात आलेला आहे. ह्या संग्रहामध्ये 'हावरट माकडोबा' या बालगीतासह एकूण १० गाण्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या सर्व बालगीतांचे व्हिडिओ स्वरूपातील सादरीकरण, खाली दिलेल्या लिंक्सवर क्लिक करून पाहू शकता.
या सर्व बालगीतांचे व्हिडिओ स्वरूपातील सादरीकरण, खाली दिलेल्या लिंक्सवर क्लिक करून पाहू शकता.
१
गोड गोड बोला
१ गोड गोड बोला
इटुकले पिटुकले तीळ गाणे गाता गाता काहीतरी सांगतायेत, चला पाहूया हया गोड गोड बडबडगीतातून!
२
सांग ना ग आई
२ सांग ना ग आई
छोट्या छोट्या दोस्तांना पडणारे मोठ्ठेमोठ्ठे प्रश्न!! पाहूया त्यांची उत्तरं कुठे लपली आहेत ते, ह्या छानश्या बालगीतातून!
३
अंकांचे गाणे
३ अंकांचे गाणे
आपली छोटीशी सयू निघाली आहे छोट्याश्या सहलीला! घराजवळच! ह्या सहलीत तिला कोण कोण भेटतंय आणि तिने त्याची कशी नोंद ठेवली, हे पाहूया ह्या गोड 'अंकांच्या गाण्यातून'!
४
चांगल्या सवयी
४ चांगल्या सवयी
चांगल्या सवयी म्हणजेच सकाळी लवकर उठणे, उठल्यावर, रात्री झोपण्यापूर्वी टूथब्रश करणे, दररोज आंघोळ करणे, लवकर झोपी जाणे इ. अशा दैनंदिन सवयींचे महत्त्व लहान मुलांना हसतखेळत दाखवण्याचा प्रयत्न ह्या गाण्यातून करण्यात आलेला आहे.
५
उन्हाळ्याची सुट्टी
५ उन्हाळ्याची सुट्टी
सगळ्या बालदोस्तांना उन्हाळ्याची सुट्टी मित्रमंडळी-भावंडांसोबत खूप खेळ खेळण्याची, गप्पा-गाणी-गोष्टींची, मनसोक्त भटकंतीची, आंबा-कैरींची, भरपूर पुस्तकांची, मजेची-मौजेची जावो, हीच सदिच्छा!!
६
गोगलगाय
६ गोगलगाय
शंखाचं घर पाठीवर घेऊन रमत-गमत जाणाऱ्या गोगलगायीचं हे गोड गाणं! नक्की बघा.
७
आकारांचे गाणे
७ आकारांचे गाणे
आपल्या आजूबाजूला पहावं तिकडे त्रिकोण, चौरस, वर्तुळ, आयत असे आकारच आकार आहेत! ह्या आकारांच्या गाण्यातून छोट्या दोस्तांना सहजपणे आकारांची ओळख होईल, आणि आपल्या आसपास असलेल्या गोष्टींमध्ये हे आकार ओळखायचा खेळ खेळताना मज्जाही येईल.
८
दिवाळी आली हो
८ दिवाळी आली हो
लखलख दिव्यांची, तेजाची, हर्षाची दिवाळी आली हो, दिवाळी आली!
९
मुंगीताई
९ मुंगीताई
आपल्याच धुंदीत गाणे गात, मस्त मजेत राहणारा नाकतोडा/टोळ विचारात पडलाय की ह्या मुंगीताई सतत एवढं काम का करत असतात? पुढे काय होतं, ते पाहूया ह्या छानश्या गाण्यातून! ('इसापनीती'मधील कथेवर आधारित)
१०
हावरट माकडोबा
१० हावरट माकडोबा
माकडोबांनी खूप म्हणजे खूप फळं गोळा करून आणली आहेत. सफरचंद, आंबे, केळी, पेरू, चिक्कू अश्शी खूप सारी फळं! ते ह्या फळांचं काय करतायेत, ते पाहूया ह्या गोड बालगीतातून!