वाघोबा
'चिऊकाऊ'च्या पुस्तकमालिकेतील 'वाघोबा' हे चौथे पुस्तक! वाघोबा ह्या पुस्तकातून चिऊकाऊच्या काही निवडक बालगीतांचा संग्रह सादर करण्यात आलेला आहे. ह्या संग्रहामध्ये 'वाघोबाची मावशी' या बालगीतासह एकूण १४ गाण्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या सर्व बालगीतांचे व्हिडिओ स्वरूपातील सादरीकरण, खाली दिलेल्या लिंक्सवर क्लिक करून पाहू शकता.
'चिऊकाऊ'च्या पुस्तकमालिकेतील 'वाघोबा' हे चौथे पुस्तक! वाघोबा ह्या पुस्तकातून चिऊकाऊच्या काही निवडक बालगीतांचा संग्रह सादर करण्यात आलेला आहे. ह्या संग्रहामध्ये 'वाघोबाची मावशी' या बालगीतासह एकूण १४ गाण्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या सर्व बालगीतांचे व्हिडिओ स्वरूपातील सादरीकरण, खाली दिलेल्या लिंक्सवर क्लिक करून पाहू शकता.
या सर्व बालगीतांचे व्हिडिओ स्वरूपातील सादरीकरण, खाली दिलेल्या लिंक्सवर क्लिक करून पाहू शकता.
१
वाघोबाची मावशी
१ वाघोबाची मावशी
इवल्याश्या मनीमाऊची भेट झाली चक्क जंगलातल्या वाघोबाशी! पाहूया त्यांच्या काय गप्पा होतात, ह्या गोड बालगीतातून!
२
ग्रहांचे गाणे
२ ग्रहांचे गाणे
आपल्या सूर्यमालेची ह्या सहज, सोप्या बालगीतातून, चित्ररूपात माहिती देण्याचा हा छोटासा प्रयत्न!
३
आईची मिठी
३ आईची मिठी
चिंता, राग, भीती काहीही असो, आईची एक मिठी मनाला अलगदपणे शांत करून जाते.... अगदी आपण कितीही मोठे झालो तरी! हो ना? त्याच खऱ्याखुऱ्या 'जादूच्या झप्पी'चं हे गोड गाणं!
४
असा कसा हा उन्हाळा
४ असा कसा हा उन्हाळा
“असा कसा हा उन्हाळा? उन्हाने नुसतं हैराण केलंय हो! काय उपाय करावा बरं, सांगाल का?” असा प्रश्न पडलाय आपल्या छोट्या दोस्ताला. त्याला काही उपाय सापडतोय का? पाहूया ह्या गोड गाण्यातून 🙂
५
मैत्री असावी अशी
५ मैत्री असावी अशी
एका तळ्याजवळ बेडूक, चतुर, गोगलगाय असे तीन मित्र राहायचे. ह्या तिघांच्या मैत्रीचं हे गोड गोड गाणं!
६
झालो मी तयार
६ झालो मी तयार
रोज गोंडुल्या एकटाच शाळेत जात नाही, बरं का! शाळेत त्याच्यासोबत जातं त्याचं दप्तर, डबा, गणवेश आणि बुटसुद्धा! ही मंडळी शाळेत जाण्यासाठी कशी तयार होतात, चला पाहूया ह्या बालगीतातून!
७
कोण बरं बोलतं घड्याळात?
७ कोण बरं बोलतं घड्याळात?
आपल्या सयूला प्रश्न पडलाय की दिवसभर घड्याळामध्ये कोण टिक-टॉक, टिक-टॉक असं बोलत राहतं? बघूया तिला उत्तर मिळतं का!
८
आजोबांची मिशी
८ आजोबांची मिशी
गोंडुल्याला हवी आहे आजोबांसारखी भारी मिशी! त्याच्या भन्नाट डोक्यात काय-काय भन्नाट कल्पना येतात, ते पाहूया ह्या गमतीदार बालगीतातून!
९
एक होती अळी
९ एक होती अळी
मटारच्या शेंगेमध्ये आली आहे एक पाहुणी! पाहूया पुढे काय होतं, ह्या बालगीतातून!
१०
मोदकाचा बेत
१० मोदकाचा बेत
गणपतीबाप्पासाठी सयूने आजीसोबत मोदकाचा बेत केला आहे. सयूचे मोदक कसे होतायेत, चला पाहूया ह्या मोदकासारख्याच गोड बालगीतातून!
११
मोठा होईन जेव्हा
११ मोठा होईन जेव्हा
मोठेपणी कोण होणार’ ह्या स्वप्नाला/कल्पनेला लहानपणी कोणतंच बंधन नसतं, सारं काही शक्य आहे असंच वाटत राहतं! आपल्या छोट्या दोस्ताला मोठेपणी कधी पोलिस व्हावंसं वाटतं, तर कधी डॉक्टर! ही गोड स्वप्नं सांगणारे त्याचे बोबडे बोल ऐकूया, ह्या गोड बोबडगाण्यातून!
१२
होती पिटुकली माशी
१२ होती पिटुकली माशी
एकदा एक पिटुकल्या माशीला प्रचंड भूक लागली होती, तिला काय बरं खाऊ मिळाला असेल? पाहूया ह्या गोड गोड गाण्यातून!
१३
दिवाळी फराळ
१३ दिवाळी फराळ
आपल्या छोट्या दादा-ताईचा दिवाळी हा अगदी आवडता सण! फराळ खाण्याबरोबरच त्या दोघांना आजी-आई सोबत फराळ बनवायलाही खूप आवडतं. त्यांच्यासोबत गाऊया हे दिवाळी फराळाचं छानसं गाणं!
१४
छत्रपती शिवाजी महाराज
१४ छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि त्यांच्या अद्वितीय कारकिर्दीचे वर्णन मोजक्या काही ओळींमधून मांडणं, ही अशक्यप्राय गोष्ट आहे. छोट्या दोस्तांसाठी साध्या सोप्या शब्दांमध्ये राजांविषयी हे बालगीत रचण्याचा प्रयत्न केला आहे.